राहुल गांधी यांना सर्वोच्च दिलासा मिळाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पंतप्रधान मोदी घाबरले हे…”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी खासदारकी लढविण्याचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी खासदारकी लढविण्याचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा दिली कारण लोकसभेत त्यांचं सदस्यत्व रद्द करायचं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना न्याय दिला आहे. ते संसदेच्या बाहेर आणि आतमध्ये जनतेचा आवाज बुलंद करतील. नरेंद्र मोदी राहुल गांधी यांना घाबरले आहेत हे यातून दिसलं आहे. राहुल गांधी लवकरच पूर्व-पश्चिम भारत जोडो यात्रा काढतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा नक्की विजय होईल. आणि ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पराभवाची नांदी आहे.”

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन

भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....

मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल

भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
