लग्नाचं गुपीत? प्रयेसीच्या अंगावर घातली गाडी, भाजप पदाधिकारी अडचणीत? प्रकरण नेमकं काय?

लग्नाचं गुपीत? प्रयेसीच्या अंगावर घातली गाडी, भाजप पदाधिकारी अडचणीत? प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Dec 17, 2023 | 1:03 PM

भाजपच्या पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षाने थेट आपल्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने उडाली मोठी खळबळ, गेल्या सहा दिवसांपासून प्रेयसीवर रूग्णालयात उपचार सुरू, भाजप पदाधिकाऱ्यानं प्रयेसीच्या अंगावर थेट घातली गाडी पण का?

मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : विवाहित असल्याचं लपवून प्रेयसीच्या अंगावर थेट गाडी घातल्याच्या आरोपात भाजप पदाधिकारी अडचणी आला आहे. भाजप युवा मोर्च्याचा अध्यक्ष आणि सनदी अधिकाऱ्याच्या मुलावर एका तरूणीनं गंभीर आरोप केले आहेत. एका २६ वर्षीय प्रिया सिंह नावाची तरूणी पेशानं फॅशन प्रमोटर आणि फिटनेस ट्रेनर आहे. दाव्यानुसार, तिचं अनेक वर्षांपासून एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आणि पालघरच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड याच्यासोबत प्रेम संबंध होते. मात्र ६ दिवसांपूर्वी तिची अवस्था गंभीर झाली. भाजप युवा मोर्च्याचा अध्यक्षाचं लग्नाचं बिंग फुटल्यानंतर त्यानं आपल्या अंगावर गाडी घातल्याचे आरोप या तरूणीने केलाय. ही घटना ११ डिसेंबरला घडली मात्र गुन्हा दाखल होऊनही कारवाई झाली नसल्याचे तिचं म्हणणं आहे. या तरूणीसोबत नेमकं काय घडलं? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 17, 2023 01:03 PM