फरारी अमृतपाल सिंगच्या पत्नीचा डाव फसला; लंडनला जाताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
खलिस्तानी अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. ती लंडनला जात होती. मात्र त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या अमृतपाल सिंगच्या पत्नीची चौकशी सुरू आहे.
अमृतसर : खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौरला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळे अमृतपाल सिंगच्या संदर्भात पोलिसांनी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फरारी अमृतपाल सिंगच्या पत्नीला गुरुवारी अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. ती लंडनला पळून जात होती. मात्र विमानात बसण्यापूर्वीच तिला ताब्यात घेण्यात आले. सध्या अमृतपाल सिंगच्या पत्नीची चौकशी सुरू आहे. पंजाब पोलिसांनी 18 मार्च रोजी वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी त्यांचे शेकडो सहकारी आणि समर्थकांना अटक केली. मात्र, अमृतपाल त्याच्या काही निकटवर्तीयांसह पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत आहेत. एवढेच नाही तर पोलीस त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत.