तर बेळगावात या, महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करा; संजय राऊत यांचं थेट आव्हान
VIDEO | बाळासाहेब ठाकरे यांचे विचारधारक असाल तर.., संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीसांवर तोफ डागली, काय दिलं आव्हान, बघा व्हिडीओ
बेळगाव : कर्नाटक राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता सीमाभागातील मराठी माणसांच्या महाराष्ट्रात जाण्याच्या आशा आकांक्षाही वाढल्या आहेत. तर काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी त्यांनी रोड शो केला आहे. बेळगामध्ये खासदार संजय राऊत यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर त्यांनी बेळगावमधूनच शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याच सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा संघर्ष हा महाराष्ट्रासाठी आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात असा अलिखित नियम आहे, कर्नाटकात राजकीय पक्षांनी प्रचाराला गेले तर सीमाभागात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी प्रचाराला जावू नये…आता गेल्या ८ वर्षांपासून नवीन चौकट आल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आणि थेट देवेंद्र फडणवीसावर आरोप केला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचारधारक असाल तर बेळगावात या…आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करा असले त्यांनी म्हटले आहे.