नुपूर शर्मा विरोधातील आंदोलनात पोलिसांवर दगडफेक
पैंगबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात आज देशभरात तीव्र निदर्शने करण्यात आली.
नवी दिल्ली – पैंगबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात आज देशभरात तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश कर्नाटक, बंगाल यासह अनेक राज्यांत जुम्म्याच्या नमाजानंतर हजारो मुस्लीम रस्त्यांवर आले होते. यावेळी नुपुर शर्मा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. झारखंड रांचीमध्येही जमाव आक्रमक झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.
Published on: Jun 10, 2022 06:30 PM
Latest Videos