Breaking | नितेश राणे यांच्याविरोधात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. आज सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली.
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात भाजप आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भाजप आमदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी भाजपने प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करत असताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका केली. सरकारवर टीका करताना, सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नितेश राणे जास्तच आक्रमक झाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केलं होतं.
नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर मुंबईतील शिवसैनिक जोरदार आक्रमक झाले. आज सकाळी भारतमाता सिनेमासमोर नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यादरम्यान पोलीस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावं, असं प्रत्युत्तर नितेश राणेंना दिलं.