रिफायनरी सर्वेक्षणस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, कुठं होतेय गाड्यांची तपासणी?

रिफायनरी सर्वेक्षणस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त, कुठं होतेय गाड्यांची तपासणी?

| Updated on: Apr 25, 2023 | 11:29 AM

VIDEO | बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू, कुठं आहे तगडा बंदोबस्त, बघा व्हिडीओ

रत्नागिरी : बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमाराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तिथे करण्यात आला. तर आंदोलनातील महिला आक्रमक होत त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्याचे पाहालया मिळाले. यापार्श्वभूमीवर रिफायनरी सर्वेक्षणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बार्शी सोनगाव या भागाला जोडणारे रस्ते तसेच सर्वच नाक्यावरती पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. रिफायनरी प्रकल्प सर्वेक्षणस्थळाच्या मार्गावर जाणा-या प्रत्येक गाड्या अडवल्या जातायत. पत्रकारांना देखील पोलिसांकडून मज्जाव केला जातोय. राजापूर धारतळे चेकपोस्टवर गाड्या तपासणी केल्या जातायत. तर 144 चं उल्लंघन झाल्याप्रकरणी बारसू वासियांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रकल्प होणाऱ्या ठिकाणचे मातीचे नमुने घेण्यासाठी आज सर्वेक्षण केले जाणार होते त्यामुळे रात्रीपासून आंदोलक महिलांसह सर्व ग्रामस्थ आपल्या जागेवरती ठिय्या म्हणून बसले होते. सध्या अटक प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Published on: Apr 25, 2023 11:29 AM