महागाईविरोधात चूल मांडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
महागाई वाढतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरदिवशी वाढ होत आहे. गॅस दरवाढीचा देखील भडका उडाला आहे. याविरोधात आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महागाई वाढतच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरदिवशी वाढ होत आहे. गॅस दरवाढीचा देखील भडका उडाला आहे. अन्न, धान्य, साखर, चहापावडर, खाद्य तेल अशा सर्वच वस्तु महाग झाल्या आहेत. महागाईला सर्वसामान्य नागरिक कंटाळले आहेत. आज महागाईविरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी केंद्र सरकारचा निषेध केला.
Latest Videos