संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत संतापाची लाट; काँग्रेसचे जोरदार आंदोलन

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत संतापाची लाट; काँग्रेसचे जोरदार आंदोलन

| Updated on: Jul 31, 2023 | 1:35 PM

तर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. तर अमरावती काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताना भिडे यांना अटक करा, अशी मागणी केली आहे.

अमरावती, 31 जुलै 2023 | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. विविध जिल्ह्यात काँग्रेसकडून आंदोलने केली जात आहेत. तर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे. तर अमरावती काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताना भिडे यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापले होते. दरम्यान त्यांनी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते हे आमदरा यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहेत.

Published on: Jul 31, 2023 01:35 PM