लोकशाही वाचवा म्हणत संसद भवनाबाहेर गांधी पुतळ्याजवळ निलंबित खासदार आक्रमक, कोणा-कोणाचा सहभाग?
नवी दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना आज अधिवेशनाच्याआधी संसद भवनाबाहेर निलंबित खासदारांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ विरोधक निलंबित खासदारांचं आंदोलन
नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३ : नवी दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना आज अधिवेशनाच्याआधी संसद भवनाबाहेर निलंबित खासदारांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. संसदेबाहेर गांधी पुतळ्याजवळ विरोधक निलंबित खासदारांनी आंदोलन केलं. यामध्ये मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी लोकशाही वाचवा, असा घोषणा निलंबित खासदारांनी दिल्यात. संसदभवन गांधी पुतळ्यापासून ते नवीन संसदभवनपर्यंत हे आंदोलन मोर्चा काढत या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तीन दिवसात १४१ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.
Published on: Dec 20, 2023 03:12 PM
Latest Videos