VIDEO : Dhairyasheel Mane यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन

VIDEO : Dhairyasheel Mane यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन

| Updated on: Jul 25, 2022 | 2:22 PM

कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन आज होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लागल्याचे चित्र आहे. धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केल्याचे कळते आहे.

कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचं जवाब दो आंदोलन आज होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता धैर्यशील माने यांच्या घरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लागल्याचे चित्र आहे. धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केल्याचे कळते आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये मोठी अस्थिरता बघायला मिळते आहे. धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याविरोधात आज शिवसैनिक आंदोलन करणार आहेत. धैर्यशील माने  यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर कोल्हापुरात नाराजी पसरली. अन् ही नाराजी आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर दिसून आली. शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला.

Published on: Jul 25, 2022 02:22 PM