मंत्र्यांनी त्वरित त्यांच्या कार्यालयात रुजू होण्याचे आदेश द्यावे अशी उच्च न्यायालयात मागणी

मंत्र्यांनी त्वरित त्यांच्या कार्यालयात रुजू होण्याचे आदेश द्यावे अशी उच्च न्यायालयात मागणी

| Updated on: Jun 28, 2022 | 3:18 PM

एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांना त्वरित त्यांचे ऑफिस जॉईन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका नागरिकांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाखल केली.

एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांना त्वरित त्यांचे ऑफिस जॉईन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका नागरिकांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाखल केली. जनतेचे महत्वाचे जीवनावश्यक विषय दुर्लक्षित करून अनऑफिशियल कारणांसाठी न सांगता राज्यातून निघून जाणे बेकायदेशीर ठरते व यातून या इतर राज्यात जाऊन बसलेल्या मंत्र्यांनी ‘ सामाजिक- सार्वजनिक उपद्रव ‘ निर्माण केल्याचे याचिकेतून म्हणण्यात आले आहे. संविधानातील शेड्युल तीन नुसार मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते की ते जनतेप्रती असलेल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत. मुख्यमंत्री तसेच त्यांच्या विभागाचे सचिव यांना न सांगता इतर राज्यात निघून जाणे व जनतेची अनेक कामे खोळंबून राहणे हा मंत्र्यांनी केलेला सामाजिक उपद्रव आहे या याचिकेच्या मुद्यांवर त्वरित सुनावणी घ्यावी अशी मागणी ॲड. असीम सरोदे यांनी आज मुख्य न्यायमूर्ती दिपांनकर दत्ता व न्या कर्णिक यांच्या खंडपीठापुढे केली.

Published on: Jun 28, 2022 03:18 PM