BEST च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सलग ६ व्या दिवशी संप सुरू, बेस्टच्या PRO चं म्हणणं नेमकं काय?

BEST च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सलग ६ व्या दिवशी संप सुरू, बेस्टच्या PRO चं म्हणणं नेमकं काय?

| Updated on: Aug 07, 2023 | 3:15 PM

VIDEO | 'बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेस्ट प्रशासन कोणतीही कारवाई करु शकत नाही, पण...', बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलं?

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | आज बेस्ट बसचा वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिनाच्या दिवशी बेस्ट मधील कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांकरिता संपावर गेलेले आहेत. आज संपाचा सहावा दिवस आहे. त्यामुळे मुंबईकर जनतेला प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. यासगळ्यावर बेस्ट प्रशासनाच्या जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टिव्ही ९ मराठीशी बोलताना ते म्हणाले, आंदोलनाला बसलेले कर्मचारी हे बेस्टचे कर्मचारी नसून कंत्राटी कंपन्यांचे कर्मचारी आहेत. गेली 6 दिवस आम्ही सतत कंत्राटी कंपन्यांशी बोलत आहोत आणि त्यांची बैठक सातत्याने घेत आहोत. बेस्ट महाव्यवस्थापक विजय सिंघल सर या सर्व कंत्राटी कंपन्यांच्या मालकांशी चर्चा करत आहेत आणि हा संप लवकरात लवकर कसा मिटावा यासाठी प्रयत्न करत आहेत. तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेस्ट प्रशासन कोणती कारवाई करू शकत नाही परंतु आम्ही आमच्या कंत्राटदार कंपन्यांवरती दबाव आणत आहोत आणि या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर या कंत्राटी कंपन्यांनी सोडवावा असे प्रयत्न आम्ही करत आहोत. या कर्मचाऱ्यांवरती मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू आहे या संदर्भात अंतिम निर्णय बेस्टचे अधिकारी घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 07, 2023 03:15 PM