VIDEO : Pune Ambil Odha “दोन दिवस झाले, आम्हाला खायला काय नाही, आम्ही काय करायचं”, स्थानिकांचा आक्रोश
पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.
पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी केदार असोसिएटसनं नोटिसा दिल्याचा आरोप केला होता. नागरिकांनी त्यांना मिळालेल्या नोटिसांवर तारीख देखील नसल्याचं म्हटलं होते. दोन दिवस झाले, आम्हाला खायला काय नाही, आम्ही काय करायचं असा स्थानिकांचा आक्रोश बघायला मिळत आहे.
Latest Videos