Pune Live | पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाईला सुरुवात, थेट LIVE

Pune Live | पुण्याच्या आंबिल ओढा परिसरात तोडक कारवाईला सुरुवात, थेट LIVE

| Updated on: Jun 24, 2021 | 11:19 AM

कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने थेट पाडकामाला सुरुवात केली, असा आरोप स्थानिकांचा आहे. तर आधी नोटीस देऊनच ही कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.

पुण्यातील आंबिल ओढ्याचा (Ambil Odha) प्रश्न चिघळला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आहे. त्यासाठी आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आंबिल ओढ्यात 700 ते 800 पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. (Pune Ambil Odha controversy what exactly happened today by whose order the action was taken Maharashtra news)

कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने थेट पाडकामाला सुरुवात केली, असा आरोप स्थानिकांचा आहे. तर आधी नोटीस देऊनच ही कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात अशा प्रकारची कारवाई नियमानुसार आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे. पावासाळ्यात अशी कारवाई करायची ठरलं नसताना, या कारवाईचे आदेश कुणी दिले यावरुन आता पुण्यात राजकारण रंगलं आहे. सर्वपक्षीय नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

Published on: Jun 24, 2021 11:19 AM