बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक अन् राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजी; पाहा नेमकं प्रकरण काय?
Bacchu Kadu Pratima Dugdhabhishek : पुण्यात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुण्यात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बच्चू कडू यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. बच्चू कडू यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली. बच्चू कडू यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली होती. बच्चू कडूंना सुद्धा न्यायालयाने शिक्षा सुनावली असून त्यांची देखील आमदारकी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत होती. त्याच्याच विरोधात आज प्रहार संघटनेने आंदोलन केलं आहे. पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्या समर्थनात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत अपंग हृदय सम्राट असा बच्चू कडू यांचा उल्लेख देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे.