चंद्रकांत पाटील गिरीश बापट यांच्या कुटुंबियांच्या भेटीला, म्हणाले…
Girish Bapat : "गिरीश बापट सगळ्या पक्षातील लोकांचा आदर करायचे, त्यामुळे आपल्या घरातील व्यक्ती गेल्याचं सगळ्यांना वाटतंय", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाहा...
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गिरीश बापट यांच्या अस्थींचा कलश ठेवला होता. गिरीश बापट यांना आदरांजली वाहण्यासाठी खूप लांबून लोकं येत आहेत. आज हा कलश वाराणसीला घेऊन जात आहेत. या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी मी आलो होतो. मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. गिरीशजी यांचा स्वभाव होता की, सगळ्या पक्षांचा आदर करायचा. त्यामुळे सगळ्यांना आपला घरातील माणूस गेला, असं वाटतं आहे. जगदीश मुळीक हा संघाच्या संस्कारात वाढलेला आहे. तो बापट साहेब यांचा शिष्य आहे. मुळीक यांच्या समर्थकांनी हे फ्लेक्स लावलेले नाहीत, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'

पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?

'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
