पुणे शहरात ‘या’ दिवशी वादळी वार्‍यांसह हलक्या पावसाचा इशारा

| Updated on: Mar 11, 2023 | 8:28 AM

Pune Rain Update : पुणे शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुणे शहरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 ते 15 मार्च या कालावधीत वादळी वार्‍यांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 7 आणि 8 मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहराचे कमाल तापमान 30 अंशांवरून पुन्हा 35 ते 36 अंशांवर गेलं आहे. उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

Published on: Mar 11, 2023 08:28 AM
आमचे 40 चुकार भाऊ भाजपापासून बाजूला जाणार का? सुषमा अंधारे यांचा प्रश्न
Big News : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची धाड; दीड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई