वटपौर्णिमेबद्दल संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या; म्हणाल्या ‘तालिबानी विचार..’
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष संगिता तिवारी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या 'अरे बाबा तुला बायको ना मुलगी ना तुला संसार, भटका माणूस उचलली जीभ लावली टाळ्याला'
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष संगिता तिवारी यांनी केली आहे. या बाबाला काय माहिती आहे, महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी नटून अलंकार घालून वडाची पूजा करतात. महिलांचा सण आहे त्या सण साजरा करणारच आणि ती आमची हिंदू संस्कृती आहे. या आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवायची नाही. तसेच ज्या महिला ड्रेस मटेरियल घालून जातात त्यांनीही वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये. अरे बाबा तुला बायको ना मुलगी ना तुला संसार, भटका माणूस उचलली जीभ लावली टाळ्याला. अतिशय बिनडोकपणाचे विधान हा आंबेवाला कायम करतो. हा आंबेवाला कायम महिलांचा, मुलींचा अपमान करत असतो महिलांच्या बाबत नेहमी वादग्रस्त विधान करायचा किंवा बोलायचा, कधी महिला मुलींची टिकली, कुंकू,कपडे यावर हा माणूस कायम टीका टिप्पणी करत असतो, असेही तिवारी यांनी म्हटले. आपल्या देशाच्या मिळालेल्या स्वातंत्र्यावर आंबेवाले भिडे म्हणतो की आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य हांडगे आणि दळभद्र स्वातंत्र्य आहे. मग जे लोक हुतात्मे झाले त्यांचा हा माणूस अपमान नाही का करत. कसे सहन करतो आपण आणि का सहन करत आहोत? असा सवालही तिवारी यांनी केलाय.