तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?

तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?

| Updated on: May 30, 2024 | 3:03 PM

पुणे कार अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. याच आरोपांवरून आता रवींद्र धंगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात रवींद्र धंगेकर यांनी विचारणा करण्यात आली असता त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना थेट उत्तर दिलं आहे

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांना नोटीस बजावणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही शंभूराज देसाई तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे कार अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. याच आरोपांवरून आता रवींद्र धंगेकरांना कायदेशीर बाबींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात रवींद्र धंगेकर यांनी विचारणा करण्यात आली असता त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना थेट उत्तर दिलं आहे. ‘जर विधानसभेत माझ्याविरोधात कोणी हक्कभंग आणला तर माझ्याकडे इतके पुरावे आहेत की मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा’, असे वक्तव्य करत रवींद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. तर रवींद्र धंगेकर पुढे असेही म्हणाले की, मला कुठलीही नोटीस प्राप्त झाली नाही मात्र मला नोटीस मिळाली तर मी कायदेशीर उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 30, 2024 03:03 PM