Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक अन्..
पुण्यातच सगळे आरोपी सापडले त्यांना पुण्यात आश्रय कुणी दिला? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखाने हा सवाल उपस्थित केला आहे. तर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी झाली असा सवाल सुप्रिया सुळे यांनी देखील विचारला आहे
बीड हत्या प्रकरणाचा पुणे कनेक्शन उघड झाले आहे. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला आज पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आली. तर फरार वाल्मिक कराड ही पुण्यातच पोलिसांसमोर शरण आला. पुणे कनेक्शनवरून धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे, मनोज जरांगे यांनी काही सवाल केले. आरोपी पुण्यात सापडत असल्याने हत्या प्रकरणावरून आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातच सगळे आरोपी सापडले त्यांना पुण्यात आश्रय कुणी दिला? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखाने हा सवाल उपस्थित केला आहे. तर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी झाली असा सवाल सुप्रिया सुळे यांनी देखील विचारला आहे. सुटण्यासाठी सामूहिक कट रचला जातोय, कुठलातरी मंत्रीच आरोपींना शिकवतोय असा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. तर राजकीय वरदहस्त असेल तर तपासात सर्व समोर येईल असं मंत्री शिरसाट यांनी म्हंटलं आहे. ‘एखाद्याचं नाव घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढवू शकत नाही काही कायदेशीर प्रोसीजर असतात. तात्काळ कुणावर कारवाई होत नाही तपासामध्ये आता आपण कोणीही अडथळा आणू नये’, असं संजय शिरसाट म्हणाले.