Pune Lockdown | आजपासून पुण्यातील ग्रामीण भागात निर्बंध शिथिल
ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट पाच टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी निकषांनुसार या परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट पाच टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी निकषांनुसार या परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोनाबाधितांचा दर कमी झाल्याने या दोन्ही शहरांतील निर्बंधांमध्ये यापूर्वीच शिथिलता देण्यात आली होती.
मुंबईनंतर पुणे ते लोणावळा मार्गावर लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका किंवा नगरपरिषदेकडून त्यासाठीचे पासेस वितरीत केले जातील. त्यानंतर रेल्वेतर्फे त्यांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात येईल.
पुणे – लोणावळा मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलच्या चार फेऱ्या सुरू आहेत. दुसरा डोस होऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनाही प्रवास करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.