Pune Crime : धक्कादायक! पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या; डोकं-हात-पाय धडापासून वेगळे अन्…
पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने आरोपीने तरूणीची निर्घृण हत्या केली आहे. तरुणीच डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करून त्याने खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात या तरुणीचा मृतदेह फेकून दिल्याची माहिती मिळतेय.
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यात एका तरूणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर या तरूणीचा मृतदेह पुण्यातील खराडी भागातील नदीपात्रात आढळून आला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरूणीचे हात आणि पाय वेगळे करूण तिला नदीपात्रात फेकल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केल्याची माहिती मिळत आहे. तर मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी विकृत आरोपीने तरूणीच्या धडापासून तिचे हात-पाय आणि डोकं वेगळं केलं. धारदार शस्त्राच्या सहाय्याने आरोपीने तरूणीचे अवयव कापून तिचे धड नदीपात्रात फेकून दिल असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Aug 27, 2024 12:27 PM
Latest Videos