पुण्यात दिवसाढवळ्या तरूणीची हत्या, धारदार सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे हिची धारदार सुऱ्यानं हत्या करण्यात आली. तर आता शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभदा कोदारे हिची आर्थिक कारणातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात दिवसाढवळ्या तरूणीवर हत्या करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे हिची धारदार सुऱ्यानं हत्या करण्यात आली. तर आता शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभदा कोदारे हिची आर्थिक कारणातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा कनोजा नावाच्या आरोपीकडून आर्थिक वादातून शुभदा कोदारे हिची हत्या करण्यात आली. याच तरूणीच्या हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुण्यातील एका आयटी कंपनीच्या इमारतीवरून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा कनोजा आणि शुभदा कोदारे यांच्यात शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं? याचेही दृश्यही व्हिडीओमध्ये कैद झाली आहेत. व्हिडीओमध्ये कृष्णा कनोजा भल्या मोठ्या कोयत्याने वार करताना दिसतोय. त्याने शुभदाच्या अंगावर चार-पाच वार करून तिला जखमी केलं. शुभदा जखमी झाल्यानंतर जमिनीवर कोळसल्याचे पाहायला मिळतंय. बघा व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?