TET Exam | टीईटी घोटाळ्याप्रकरणी GA टेक्नॉलॉजी कंपनीच्या तत्कालीन संचालकाला अटक
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता. सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीय. यापूर्वी डेरेंना निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.
Latest Videos