सुखदेव डेरेच्या संगमनेर येथील घराची पुणे पोलिसांकडून झडती, 2 लाखांहून अधिक रक्कम जप्त

सुखदेव डेरेच्या संगमनेर येथील घराची पुणे पोलिसांकडून झडती, 2 लाखांहून अधिक रक्कम जप्त

| Updated on: Dec 26, 2021 | 12:46 PM

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील( TET Exam scam )आरोपी परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेच्या ( sukhadev dere) घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली आहे. पुणे सायबर सेलचे (pune  cyber cell)  सहाय्यक पोलिस निरीक्षक कादीर देशमुख यांच्या पथकाने ही झडती घेतली.

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील( TET Exam scam )आरोपी परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त सुखदेव डेरेच्या ( sukhadev dere) घराची झडती पुणे पोलिसांनी घेतली आहे. पुणे सायबर सेलचे (pune  cyber cell)  सहाय्यक पोलिस निरीक्षक कादीर देशमुख यांच्या पथकाने ही झडती घेतली. तब्बल तीन तास झडती घेण्याचे काम सुरु होते. या झडतीत पोलिसांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम हस्तगत केली आहे. संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात डेरे यांचे “सुखयश निवास” स्थान आहे. यावेळी पोलिसांनी डेरे यांच्या कुटुंबियांचे जबाबही नोंदवले आहेत.