Pune : ‘डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही, पण ही गोष्ट खरी की…’, ‘त्या’ 10 लाखांसंदर्भात मंगेशकर रूग्णालयानं स्पष्टच सांगितलं…
गरोदर महिलेच्या मृत्यूचा ठपका शासनाच्या अहवालामध्ये रुग्णालयावरच ठेवण्यात आला. या सर्व प्रकारानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
पुण्यात मंगेशकर रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे दहा लाखांच्या डिपॉझिटची मागणी करण्यात आली. मात्र कुटुंबाने अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली तरी देखील रूग्णाला अॅडमिट करण्यात आले नव्हते. दरम्यान उपचाराआभावी गरोदर महिलेचा जीव गेला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. यासंदर्भात दीनानाथ मंगेकर रूग्णालयाने पत्रकार परिषद आज घेतली. यावेळी १० लाख रूपये डिपॉझिट मागणीसंदर्भात भाष्य केले. आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांनी अॅडमिशनच्या फॉर्मवर चौकोन करून दहा लाख रुपये डिपॉझिट नमूद केले, असं म्हणत डॉ. धनंजय केळकर यांनी १० लाख डिपॉझिटची मागणी केल्याच्या प्रश्नावर भलतंच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. पुढे केळकर यांनी असेही सांगितले की, मी इथे दररोज दहा शस्त्रिक्रिया करतो, माझ्या आयुष्यात मी किती तरी शस्त्रक्रिया केल्या असतील पण मी असं कधीही कोणालाही लिहून दिलेलं नाही. तुम्ही त्यांना विचारू शकता. मात्र जर कोणाला डिपॉझिट घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंटला डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची हे ठरवलं जातं. मात्र हे काही ठराविक केसेसमध्येच होत असल्याचे डॉ. धनंजय केळकर यांनी स्पष्ट केले.