Pune | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, रस्त्यावर झोपून वाहतूक गाडी अडविण्याचा प्रयत्न
मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप तरुणीवर गुन्हा दाखल झालेला नाही. ही तरुणी नेमकी कोण आहे, याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली.
Latest Videos

कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?

तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू

'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत

तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
