फरार गुन्हेगारांचं फेवरेट डेस्टिनेशन पुणे? जेव्हा सापडेल मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात!
पुणे मावळ पट्ट्यातल्या भाईगिरीसाठी लिहिलेलं हे गाणं दिवसेंदिवस खरं होतंय. कधी काळी सराईत गुन्हेगारांचा लपण्याचा अड्डा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ होता. पण सध्या पुणे फरार गुन्हेगारांचं फेवरेट डेस्टिनेशन बनलंय.
राज्यभर करा गुन्हे त्यानंतर लपण्यासाठी गाठा पुणे… या आशयाचं एक गाणं सोशल मीडियात चर्चेत राहिलंय. विरोधकांनी हे सारे आरोपी नेमके पुण्यातच कसे काय लपून बसले होते यावरून टीका केली आहे. त्यात वाल्मिक कराडचा समर्थक आणि स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाने सिने दिग्दर्शकांना सुद्धा लाजावणारा दावा केला. जेव्हा सापडेल मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात! पुणे मावळ पट्ट्यातल्या भाईगिरीसाठी लिहिलेलं हे गाणं दिवसेंदिवस खरं होतंय. कधी काळी सराईत गुन्हेगारांचा लपण्याचा अड्डा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ होता. पण सध्या पुणे फरार गुन्हेगारांचं फेवरेट डेस्टिनेशन बनलंय. ड्रग्ज प्रकरणातला माफिया ललित पाटील पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्येच नऊ महिने तळ ठोकून होता. ससून मधूनच तो ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा सुद्धा आरोप झाला. 22 दिवस फरार राहून पुण्यात CID समोर वाल्मिक कराड सरेंडर झाला. 22 दिवसांपासून फरार वाल्मीक कराड हा सुद्धा पुण्यातच काही काळ लपला आणि पुण्यातूनच सरेंडर झाला. 25 दिवसांपासून गायब झालेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचाही ठावठिकाणा पुण्यातच लागला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट