Pune : भोरमधील भोलावडे गावात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन सोहळा थाटात

Pune : भोरमधील भोलावडे गावात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन सोहळा थाटात

| Updated on: Apr 18, 2022 | 10:47 AM

भोरमधील भोलावडे गावात नीरा नदी काठावर दगडी बांधकामात साकारलेल्या श्री. भैरवनाथ मंदिरातं (Temple) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पुणे : भोरमधील (Bhor) भोलावडे गावात नीरा नदी (river) काठावर दगडी बांधकामात साकारलेल्या श्री. भैरवनाथ मंदिरातं (Temple) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तर या सोहळ्यासाठी गावात प्रत्येक घरासमोर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. तीन दिवस चाललेल्या ह्या सोहळ्या दरम्यान जागरण गोंधळ, भारूड यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. पंचक्रोशीतल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीतं हा सोहळा पार पडला.

Published on: Apr 18, 2022 10:46 AM