कसबा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; पु्ण्यातील निकालाकडे राज्याचं लक्ष
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; कुठे होणार मतमोजणी? कशी व्यवस्था असणार? पाहा सविस्तर व्हीडिओ...
पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. कोरेगाव पार्कमधील अन्न धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मजमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कातील मतमोजणी परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सेंट मीरा कॉलेज ते अतुर पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गल्ली क्रमांक 1 मधून प्रवेश दिला जाईल. तर दरोडे पथ मार्गावर वाहनं उभी करता येणार नाहीत. उद्याच्या या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.