‘गिरीश बापट यांना त्रास होत होता, पण यातना आम्हाला जाणवत होत्या, त्यामुळे आज प्रचार नाही’; कुणाचा निर्णय?
VIDEO | गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडरसह व्हिलचेअरवर बसून प्रचारात अन् कसब्याचा उमदेवार म्हणतो आज प्रचार नकोच, पण का?
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनल्याचे पाहायला मिळत आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप खासदार गिरीश बापट हे थेट व्हिलचेअरवर बसून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. गिरीश बापट हे आजारी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र असं असताना देखील पक्षासाठी ते आज व्हिलचेअरवर बसून कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. तर काँग्रेसनेही या मतदारसंघात जोर लावला आहे. कसब्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना तिकीट न दिल्याने टिळक समर्थकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी टिळक कुटुंबीयांनी उघड केली होती. त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ राखण्यासाठी आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले होते. गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून प्रचारात सहभागी झाले होते. बापट यांना या अवस्थेत पाहून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.