Pune Lok sabha Election Result 2024 : पुण्यातील मतमोजणीला ब्रेक, कसब्यात काँग्रेसचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सुरू आहे. अवघ्या काही तासात देशाचा कारभार पुढील ५ वर्ष कोण सांभाळणार याचा फैसला होणार आहे. राज्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. या मतदानानंतर राज्यातील जनतेचे मतमोजणीच्या आकड्यांकडे लक्ष लागले आहे.
देशासह राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज सुरू आहे. अवघ्या काही तासात देशाचा कारभार पुढील ५ वर्ष कोण सांभाळणार याचा फैसला होणार आहे. राज्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला. राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून बारामती लोकसभा मतदार संघ ठरली. या ठिकाणी पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच लढत झाली. अशातच पाच टप्प्यात झालेल्या या मतदानानंतर राज्यातील जनतेचे मतमोजणीच्या आकड्यांकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कसब्यातील मतमोजणीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मतदानासाठी असणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये ४ मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपानंतर कसब्यातील मतमोजणी काही वेळासाठी थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.