Pune | पुण्यात घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा खून

Pune | पुण्यात घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा खून

| Updated on: Dec 07, 2021 | 7:38 PM

मुलं भांडण करतात तसेच सतत त्रास देत असल्याच्या तक्रारीवरुन नवरा बायकोच्यात झालेल्या भांडणात बायकोचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडक पोलिसांनी नवऱ्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

पुणे : मुलं भांडण करतात तसेच सतत त्रास देत असल्याच्या तक्रारीवरुन नवरा बायकोच्यात झालेल्या भांडणात बायकोचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडक पोलिसांनी नवऱ्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. आसमा तौसिफ हवारी शेख (वय 27) असे खून झालेल्या विवाहितीचे नाव आहे. पोलिसांनी  तौफिक नूरहंसन हवारी शेख याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख कुटुंब भवानी पेठ येथील गुलशन बेकरीच्या मागे राहण्यास आहे. तौफिक हा सलूनच्या दुकानात काम करतो. त्यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं सतत भांडण करतात आणि त्रास देत असल्याबाबत तक्रार आसमा सतत तौफिककडे करत.. त्यावरून या दोघात भांडण देखील होत असे. दरम्यान, रात्री देखील आसमाने मुलं त्रास देत असल्याबाबत सांगितले. त्यावेळी तौफिक जेवण करत होता. त्याने जेवण तरी करू देते का, असे म्हणाला. अन यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याने आसमाला पोटातलाथाबुक्यांनी डोके भिंतीवर आपटले. यात आसमाला गंभीर मार लागला. त्यानंतर आसमा या झोपल्या. सकाळी उशीर झाल्याने तौफिक आसमा यांना उठवण्यास गेला असता त्या उठल्या नाही.