Pune Mega Block : पुणेकरांनो… आज पुणे-लोणावळा मार्गावरील ‘या’ लोकलच्या 12 फेऱ्या रद्द
पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरूस्तीच्या तांत्रिक कामासाठी आज रविवारी पुणे-लोणावळा मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. घेण्यात आलेल्या या ब्लॉकदरम्यान, पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहे.
पुणे, २१ जानेवारी २०२४ : पुणेकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे-लोणावळा मार्गावरील एकूण 12 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-लोणावळा सेक्शनवर अभियांत्रिकी आणि दुरूस्तीच्या तांत्रिक कामासाठी आज रविवारी पुणे-लोणावळा मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. घेण्यात आलेल्या या ब्लॉकदरम्यान, पुणे ते लोणावळा दरम्यानच्या लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि दुरूस्तीच्या तांत्रिक कामासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559, लोणावळ्याहून पुण्यासाठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561, तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589, लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द आणि लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द असणार आहे.