पुण्यातले मनसे नेते वसंत मोरेंची जाहीर नाराजी, पक्षात पडले एकाकी

पुण्यातले मनसे नेते वसंत मोरेंची जाहीर नाराजी, पक्षात पडले एकाकी

| Updated on: May 10, 2022 | 3:15 PM

पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी व्यक्त केली आहे. मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे, असे ते म्हणाले आहेत.

पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी व्यक्त केली आहे. मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे, असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, असेही मोरे म्हणाले आहेत. शहराध्यक्ष पद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मोरे कोअर कमिटीसोबत पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissioner) भेटायला आले होते. त्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा दिसून आला. पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात सुसंवाद काय संवादही नाही, अशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली.

Published on: May 10, 2022 03:15 PM