Special Report | मारहाणीची सुरुवात महिला सरपंचाकडूनच?
या प्रकरणात आता एक नवा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये महिला सरपंच गौरी गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एका महिला सरपंचाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. संबंधित घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली होती. दरम्यान, या प्रकरणात आता एक नवा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये महिला सरपंच गौरी गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीकडून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं होतं. त्यावेळी काही कारणामुळे तिथे वाद निर्माण झाला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सुजित काळभोर याने महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौरी गायकवाड यांनी केलेल्या आरोपानुसार त्या लसीकरण केंद्रावर पाहणीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी सगळ्यांची विचारपूसही केली. तेव्हा सुजित काळभोर आणि एका ग्रामपंचायत सदस्याच्या मुलामध्ये वाद झाला. काळभोर याने त्या मुलाला मारहाण केली. त्याबाबत विचारलं असता काळभोर याने आपल्यालाही शिवीगाळ केली, हात पिरगाळला आणि मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.