पुणेकरांनो…उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून आनंदाची बातमी
VIDEO | पुणेकरांनो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या हव्या तिथं मनसोक्त घालवा, एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून दिलासादायक बातमी, बघा कोणती?
पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी संपूर्ण राज्यभरात 59 जादा बसेसची सुविधा उपलब्ध कऱण्यात येणार आहे. यामध्ये पुणे स्वागगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड डेपोमधून उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त 16 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. एसटीच्या प्रवास भाड्यात महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट देणाऱ्या महिला सन्मान योजनेला एक महिना पूर्ण झालाय. एसटी प्रवासात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज्य सरकारकडून महिला सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. आता या योजनेला राज्यातील महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात 4 कोटींच्या वर महिलांनी 50 टक्के प्रवास भाडे भरत प्रवास केल्याचं समोर आलं आहे. एका महिन्यात तब्बल 4 कोटी 22 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पुणे जिल्ह्यात महिलांची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. जिल्हयात एका महिन्यात 1 कोटींच्या वर महिलांनी महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे.