वसंत मोरे यांचं एक FB लाईव्ह अन् आजींना मिळाला न्याय, काय आहे नेमकं प्रकरण
VIDEO | मनसे नेते वसंत मोरे यांच्या फेसबुक लाईव्हने 21 वर्ष संघर्ष करणाऱ्या आजीला मिळाला न्याय
पुणे : पुण्यातील राजकारणात मनसेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र यंदा ते कोणत्याही राजकीय टीका टिप्पणीमुळे नाहीतर सामाजिक कार्य केल्यानं वसंत मोरे यांची चर्चा होतेय. वय ७३ वर्षे वय असणाऱ्या पुष्पा राठोड. त्यांचे पती अरविंद राठोड यांनी मनपात ४० वर्षे सेवा दिली. २००२ साली राठोड सेवानिवृत्ती झाली. मनपाचे त्यांना पेन्शन दिली नाही. २००२ ते २०१३ अशी ११ वर्षे स्वतः राठोड यांनी स्वतःच्या पेन्शनसाठी संघर्ष केला. मनपाच्या वेगवेगळ्या विभागात पेन्शनसाठी जात होते. २०१३ साली अरविंद राठोड यांचे निधन झाले. अरविंद राठोड यांचा संघर्ष संपला. त्यानंतर २००२३ पर्यंत पुष्पा राठोड यांनी पेन्शनच्या हक्कासाठी संघर्ष केला. पण, त्यांना पेन्शन मिळाली नाही. पुष्पा राठोड यांनी वसंत मोरे यांचं फेसबुकच्या माध्यमातून काम पाहिलं. त्यानंतर माहिती घेतल्यावर वसंत मोरे यांनी मनपामधून माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांना पुष्पा राठोड यांचा प्रश्न समजावून सांगितला. याची जाणीव करून दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि २१ वर्षांच्या पेन्शनचा फरक पुष्पा राठोड यांना मिळाला आहे.