अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले अन् थेट पुणे विद्यापीठात घुसले, राडा करण्याचं कारण काय?
VIDEO | पुणे विद्यापीठात मोठी तोडफोड, अभाविपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी विद्यापीठात घुसून उधळून लावली बैठक
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील गाणं चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलनही केले आणि विद्यापीठात सुरू असलेली बैठकही चांगलीच उधळून लावली. त्यानंतर या आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या या राड्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. राड्यामुळे कुलगुरुंनाही बैठक थांबवावी लागली. तासभर या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता या आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजाच्या काचा फोडल्या. कागद फाडून तेही उधळले. ही तोडफोड करत असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत होते. अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली.