'मराठी येत नाही मी बोलणार नाही, काय करायचे ते...', भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसे स्टाईल दणका

‘मराठी येत नाही मी बोलणार नाही, काय करायचे ते…’, भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसे स्टाईल दणका

| Updated on: Jul 19, 2024 | 5:13 PM

पुण्यातील धानोरी उपगरातील परप्रांतीय व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला. मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा? असे म्हणत परप्रांतीय व्यवसायिकाने मराठी भाषेत संवाद साधणं नाकारलं अन्....

महाराष्ट्र राज्यात फक्त मराठीच भाषा वापरली जावी असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कायमच आग्रह राहिला आहे. दरम्या, पुण्यात मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यानी जोरदार चोप दिल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील धानोरी उपगरातील परप्रांतीय व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला. मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा? असे म्हणत परप्रांतीय व्यवसायिकाने मराठी भाषेत संवाद साधणं नाकारलं. यानंतर मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यानी चोप दिला. मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? असे म्हणत हेकेखोरपणे उद्धट वर्तन करणाऱ्याला पुण्यात आज मनसे स्टाईल दणका देण्यात आला. मनसे कार्यकर्त्यानी परप्रांतीय व्यवसायिकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर व्हायरल होत आहे. ही घटना पुण्यातील धानोरी प्रभागात घडल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देत कळवले आहे.

Published on: Jul 19, 2024 05:13 PM