पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचं 1 मे ला उद्घाटन; काम किती पूर्ण?
Pune Chandani Chowk : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचं उद्घाटन 1 मे ला होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील कामाला आता वेग आलाय. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचं उद्घाटन 1 मे ला होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील कामाला आता वेग आलाय. 1 मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य पुलाचं उद्घाटन होणार आहे. चांदणी चौकातील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. 15 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्विस रोडची कामं पूर्ण झाली आहेत. 10 एप्रिलला सुरू चांदणी चौकातील सर्विस रोडहोणार होणार आहे. त्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक या दोन पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्या अनुषंगाने लवकरच परिपत्रक शासनाकडून जाहीर होणार आहे. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत. 10 एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचं ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आलं आहे.