AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जाणार- चंद्रकांत पाटील

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जाणार- चंद्रकांत पाटील

| Updated on: Apr 10, 2023 | 12:24 PM

Maharashtra Unseasonal Rain Update : मागच्या काही दिवसांपासून राज्यभर अवकाळी पाऊस पडतोय. शेतीचं मोठं नुकसान झालंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्यभर अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे ठिकठिकाणी पिकांचं नुकसान झालंय. सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अशात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य केलंय. “अवकाळी पावसाबाबत कायम स्वरुपी कायदा कॅबिनेटमध्ये केला आहे. नुकसान भरपाईचा रेटही ठरला आहे. नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश आता जिल्हाधिकारी देतील. ड्रोनच्या माध्यमातून पाहणी करून पंचनामा केला जाईल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय.

Published on: Apr 10, 2023 12:22 PM