Income Tax Raid | पुण्यात आयकर विभागाची मोठी कारवाई; आयकरच्या रडारवर नेमकं कोण?

Income Tax Raid | पुण्यात आयकर विभागाची मोठी कारवाई; आयकरच्या रडारवर नेमकं कोण?

| Updated on: May 04, 2023 | 10:46 AM

VIDEO | पुण्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची धाड, कोणावर होणार कारवाई?

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुणे शहरात आयकर विभागाने (Income Tax Raid) मोठी कारवाई केली आहे. पुण्यात सकाळपासूनच बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाने धाड टाकण्यास सुरूवात केली आहे. पुणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये किती बेहिशोबी रक्कम, मालमत्ता उघड होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहेत आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. पुण्यातील सिंध सोसायटीत राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानावर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली आहे. हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती समोर आली असल्याने आयकर विभागाने आज सकाळीच पुण्यात धाड टाकली आहे.

Published on: May 04, 2023 10:46 AM