येळकोट-येळकोट जय मल्हार! जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात आंब्यासह सुगंधी फुलांचा दरवळ

येळकोट-येळकोट जय मल्हार! जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात आंब्यासह सुगंधी फुलांचा दरवळ

| Updated on: May 21, 2023 | 2:17 PM

VIDEO | महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आंब्यांसह पानाफुलांची आकर्षक सजावट

पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पुण्यातील जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आज आंब्यांची आणि पाना फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय. उन्हाळ्यामध्ये अनेक भक्तगण देवाला आंबे अर्पण करतात. त्याच्यातून ही खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट केली जाते. सध्या शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टी दिवशी अनेक चाकरमानी भाविक जेजुरीत दर्शनासाठी गर्दी करीत असतात. त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळीच ही आरास करण्यात आलीय. ही आरास पाहण्यासाठी भाविकांनीही गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. गाभाऱ्यात करण्यात आलेल्या आंब्याच्या सजवटीमुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडल्याचं दिसतंय. करण्यात आलेल्या या अंब्यांच्या सजावटीमुळे खंडोबा मंदिराचा गाभारा एखाद्या आमराईप्रमाणे दिसतोय. तर ज्येष्ठ महिन्याच्या सुरूवातीला प्रत्येक वर्षी मंदिरामध्ये ही आंब्यांची आरास केली जाते.

Published on: May 21, 2023 02:17 PM