मावळात रंगली छकडी बैलगाडा शर्यत; कुणी मारली बाजी?

मावळात रंगली छकडी बैलगाडा शर्यत; कुणी मारली बाजी?

| Updated on: Apr 28, 2023 | 9:47 AM

बापदेव महाराज उत्सवानिमित्त छकडी बैलगाडा शर्यतीचं आयोजन; कोणती बैलजोडी ठरली घाटाचा राजा? पाहा...

मावळ,पुणे : मावळमधील किवळे गावच्या बापदेव महाराजांच्या उत्सवाला शेतकऱ्यांचा आवडता खेळ छकडी बैलगाडा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. यात राज्यभरातून 180 बैलगाडा शौकिनांनी भाग घेतला होता. या छकडी बैलगाडा स्पर्धेत हेमचंद्र देशमुख,यांच्या बैलजोडीने 14 सेकंद 30 मिली पॉईंटवर सेमी फायनल मारून मालकाला लखपती केलं. तर नामदेव कोंडे यांच्या लक्ष आणि मल्हार ही बैलजोडी घाटाचा राजा ठरली. 14 सेकंद 34 मिली पॉईंटच्या वेगाने घाट पार केला. बापदेव महाराज बैलगाडा उत्सव समिती समस्त किवळे गाव यांच्यामार्फत बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. प्रत्येक छकडी बैलगाडा स्पर्धकाला 15 सेकंदात घाट पार करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. यात मुख्यतः जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, बेळगाव, मुंबई, पुण्यासह धाराशिवमधून विशेष बैलजोड्या आल्या होत्या.

Published on: Apr 28, 2023 09:47 AM