पुण्यात काळभैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार, कुणी मारलं मैदान?
VIDEO | पुण्याच्या काळभैरवनाथ यात्रेनिमित्त काळभैरवनाथ केशरी भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन
पुणे : पुण्याच्या भोरमधील भोलावडे गावात ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेनिमित्त दरवर्षी भाविक दाखल होत असतात. भोलावडे गावात ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रेनिमित्त काळभैरवनाथ केशरी भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात आलं होत. या शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 107 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये मुळशी तालुक्यातील घोटावडे गावच्या वाघजाई प्रसन्न बैलजोडीनं प्रथम क्रमांक मिळवत मैदान मारलंय. शर्यतींचा हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती.
Published on: Apr 18, 2023 02:58 PM
Latest Videos