Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेजचा हिमाचलमध्ये डंका, का होतंय विद्यार्थ्यांचं कौतुक?

पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेजचा हिमाचलमध्ये डंका, का होतंय विद्यार्थ्यांचं कौतुक?

| Updated on: Apr 26, 2023 | 2:49 PM

VIDEO | आकुर्डीतील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कमाल, हिमाचल प्रदेशमध्ये होतंय कोतुक, बघा व्हिडीओ

पुणे : पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी मधल्या डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑफरोड इलेक्ट्रिक कार बनवली आहे. हिमाचल प्रदेशात घेण्यात आलेल्या स्पर्धेत या कारला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी मधल्या डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑफरोड इलेक्ट्रिक कार बनवली असून विशेष म्हणजे सोसायटी ऑफ ऑटो मोटिव्ह इंजिनिअर्सकडून हिमाचल प्रदेशात घेण्यात आलेल्या स्पर्धेत या कारला प्रथम पारितोषिक मिळाल्याचे सांगितले जात आहे. या स्पर्धेत देशभरातून 84 कॉलेजने भाग घेत त्यांनी बनवलेल्या ऑफ रोड इलेक्ट्रिक कारचं सादरीकरण केलं. या 84 प्रतिस्पर्ध्यातून डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या ऑफरोडकारसाठी प्रथम क्रमांक पटकावला.  इतरही अनेक पारितोषिक या टीमने मिळवलीत नेमकी कशी आहे कार, काय आहे ही स्पर्धा बघा व्हिडीओ…

Published on: Apr 26, 2023 02:49 PM