Pune | खडकवासला धरणात गेलेल्या 2 मुलींचा मृत्यू, काय घडलं ज्यामुळे गमावले प्राण

Pune | खडकवासला धरणात गेलेल्या 2 मुलींचा मृत्यू, काय घडलं ज्यामुळे गमावले प्राण

| Updated on: May 15, 2023 | 12:43 PM

VIDEO | खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा मृत्यू, तर 7 पैकी 5 मुलींना वाचविण्यात यश

पुणे : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलासह स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ पैकी ५ मुलींना वाचवण्यात यश तर २ मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील खडकवासला परिसरातील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी गेलेल्या २ मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे ७ पैकी ५ मुलींना वाचविण्यात यश आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघी बुडाल्याची माहिती मिळतेय. तर एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र दुसऱ्या मुलीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरूच आहे. कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या असता जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत स्थानिकांनी धरणामध्ये उड्या मारत सात जणींचे प्राण वाचवले.

Published on: May 15, 2023 12:42 PM