पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागात पाणीपुरवठा बंद, कधी नसणार पाणी?

पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद, कधी नसणार पाणी?

| Updated on: Apr 18, 2023 | 9:32 AM

VIDEO | पुण्यात या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील हडपसर भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत येणाऱ्या रामटेकडी मुख्य जलवाहिनीच्या उद्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामकाज होणार आहे, त्यामुळे हडपसर भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तर गुरुवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचेही महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर संपूर्ण रामटेकडी परिसर, रामटेकडी औद्योगिक परिसर, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदुवाडी, रामनगर आनंद सागर ,हडपसर गावठाण, सातव वाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्त्याची डावी बाजू, केशवनगर यासह अनेक भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Published on: Apr 18, 2023 09:21 AM